भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

 

भंडारा, दि. 18 मे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 29 में 2023 ते 07 जून 2023 या कालावधीत SSB कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

 

जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे दिनांक 23 मे 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी मुलाखातीला येतांना Facebook पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) सर्च करुन त्यामधील SSB-53 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

 

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंम्बईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सटिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एम.एस.पी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

 

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी pctcoit@yahoo.in व दूरध्वनी क्र. 0253-2451032 दूरध्वनीवर संपर्क करावा किंवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भंडारा केले आहे.