आरसेटीचे 10 दिवसीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

आरसेटीचे 10 दिवसीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

 

भंडारा: भारत सरकार, महाराष्ट्र शासन व बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांचे मार्फत निशुल्क मत्स्यव्यवसायचे 10 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम 16 मे 2023 पासून सुरु होत आहे.

 

प्रशिक्षणामध्ये अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय वर्णन आणि व्याप्ती, मत्स्यसंवर्धन लागवडीयोग्य माशांच्या प्रजाती, माशांसाठी तलाव तयार करणे, मत्स्यबीज संगोपन आणि साठवण, माशांच्या प्रजातींची प्रजनन पध्दती वर्णन, शोभिवंत मत्स्यपालन, फिश न्युट्रिशन आणि फीड तंत्रज्ञान, पंगासिअस आणि नाईल तिलापिया, कोळंबी आणि ताजे पाणी मोती संस्कृती वर्णन पध्दत, अर्थशास्त्र आणि व्यवहार्यता, उत्पादनासाठी विविध माशांच्या प्रजातींची केज संस्कृती, माशांचे सामान्य रोग आणि त्यांचे व्यवस्थापन, यशस्वी उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी मत्स्यपालन युनिटला भेट, कॅनिंग पॅकेजिंग तंत्रज्ञान, प्रकल्प अहवाल तयार करणे, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना याबद्दल मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीसाठी येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, सोबत आणणे आवश्यक आहे.

 

प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, चहा, नाश्ता, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल. स्वयरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय 18 ते 45 वर्ष, शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष, महिलांनी मुलाखतीकरीता 16 मे रोजी सकाळी 10 वाजता बि. ओ. आई. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादुर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक मिलींद इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9511875908, 8669028433,9766522984 व 8421474839 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.