अनुकंपाधारकांची यादी प्रसिद्ध

अनुकंपाधारकांची यादी प्रसिद्ध

 

भंडारा : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्यांना कुटूंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याकरिता सामान्य प्रशासन जिल्हा परिषद भंडारा या कार्यालयास अर्ज केलेल्या उमेदवारांनी उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रे, प्रमाणपत्र व इतर माहितीच्या आधारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेकरिता नोंदणी रजिस्टरवर नोंदणी केलेली आहे. प्राप्त अर्जाची छाननी तपासणी करुन यादी तयार करण्यात आलेली यादी bhandara.gov.in व bhandarazp.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. एक प्रत जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा समीर कुर्तकोटी यांनी कळवले आहे.