संत रोहीदास चर्मोकार महामंडळाचा वर्धापनदिन संपन्न

संत रोहीदास चर्मोकार महामंडळाचा वर्धापनदिन संपन्न

 

भंडारा दि. 3 : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित येथे नुकताच 2 मे रोजी महामंडळाचा 49 वा वर्धापनदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी चर्मकार समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत तांडेकर, सचिव देवेंद्र तांडेकर, दिलीप तांडेकर, शरद बसेशंकर व इतर समाजबांधव उपस्थित होते.

 

यावेळी महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनेअंतर्गत व्यवसायासाठी लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्पना भंगाळे यांनी केले.