कृषी पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रीत· 30 जून पर्यंत अर्ज सादर करावे

कृषी पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रीत· 30 जून पर्यंत अर्ज सादर करावे

 

भंडारा, दि. 21 : कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा व कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था/गट यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

 

कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले व्यक्ती /गट / संस्था यांचे वरिल कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जिल्ह्यातील जास्‍तीत जास्‍त शेतकरी/गट/संस्था/व्यक्ती यांनी कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्‍या नजीकच्‍या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक 30 जुन 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन कृषी कार्यालयाने केले आहे.