जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचा गुजरात राज्यात अभ्यास दौरा संपन्न

जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचा गुजरात राज्यात अभ्यास दौरा संपन्न

 

भंडारा, दि. 9 : समग्र शिक्षा, राष्ट्रीय आविष्कार अभियान (RAA) सन 2022-23 – Exposure Visit Outside State या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्हयातील आदर्श शाळांमधील निवडक 25 विद्यार्थी व 4 शिक्षक तसेच जिल्हा कार्यालयाचा एक प्रतिनिधी असे एकूण 30 विद्यार्थी व शिक्षक/प्रतिनिधी यांचा दि. 28 फेब्रुवारी 2023 ते 6 मार्च 2023 या कालावधीत अहमदाबाद/वडोदरा (गुजरात) येथे शैक्षणिक अभ्यासदौरा यशस्वीरित्या संपन्न झाला.

 

दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षण सभापती, जि. प. भंडारा रमेश पारधी व शिक्षणधिकारी, प्राथमिक रवींद्र सोनटक्के यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासदौऱ्यासाठी शुभेच्छा देऊन रवाना केले.

 

या अभ्यासदौऱ्याच्या स्थळांमध्ये वस्तूसंग्रहालय, प्राणिसंग्रहालय, तारांगण, वारसा इमारती, अभयारण्ये, माहिती प्रसार केंद्र, भौगोलिक-ऐतिहासिक स्थळे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी स्थळे, धरणे यासारख्या बाबींचा समावेश अपेक्षित होते. त्यानुसार अभ्यासदौरा कालावधीत गुजरात राज्यातील साबरमती आश्रम, रुडाबाईची 5 मजली ऐतिहासिक बावडी, वैष्णोदेवी मंदिर, अक्षरधाम मंदिर, कंकारिया लेक व झू, अटल ब्रीज, सायन्स सिटी (Science Carnival 2023, Nature Park, Hall of Science, Hall of Space, Nature Park, Robotics Gallary, Aquatic Gallary, Life Science Park, Planet Earth व सरदार सरोवर / Statue of Unity (केवडीया, एकता नगर) इत्यादी स्थळांना अभ्यासपूर्ण भेटी देऊन सर्व विद्यार्थी व शिक्षक दि. 6 मार्च 2023 रोजी सकाळी भंडारा येथे सुखरुप परतले.

 

या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक, वैज्ञानिक, वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन आनंदाची पर्वणी अनुभवता आली. या उपक्रमांबाबत लोकप्रतिनिधी, शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.