महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्काराकरिता अर्ज

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्काराकरिता अर्ज

गडचिरोली, दि.24: महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्कारा नियमावली बाबतचा शासन निर्णय दिनांक 8 मार्च, 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये वीरशैव – लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/ दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार सन 2022-23 साठी देण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी रितसर अर्ज उपरोक्त पुरस्कारासाठी संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात कार्यालयीन वेळेस (सुट्टीचे दिवस वगळुन) दिनांक 14/03/2023 रोजी पुर्वी अर्ज सादर करण्यात यावेत. अर्जाचा नमुना प्रत या कार्यालकडुन प्राप्त करुन घ्यावे. व अधिक माहितीसाठी या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे आवाहन अमोल यावलीकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालय संपर्क क्र.07132-222192.