सुशिक्षित बेरोजगारांकरिता पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 25 व 26 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

सुशिक्षित बेरोजगारांकरिता पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत

 

25 व 26 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

 

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

 

चंद्रपूर, दि.23 : राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्‍यामार्फत रोजगार निर्मीतीकरिता कृषी महोत्‍सव चंद्रपूर येथे जनजागृती मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

 

दिनांक 25 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वा. चांदा क्‍लब ग्राऊंड नागपूर रोड वरोरा नाका, चंद्रपूर येथे सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये खादी व ग्रामोद्योग आयोग यांचे तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. मध्‍ये सेवा उद्योगाकरिता कमाल मर्यादा 20 लाख रूपये व निर्माण उद्योगसाठी कमाल मर्यादा 50 लाख रूपयापर्यंत बॅंकेमार्फत कर्जाची तरतूद करण्‍यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी 15 टक्‍के ते 35 टक्‍के सबसिडीची तरतूद आहे.

 

यामध्ये खनिज आधारित उद्योग, वन आधारित उद्योग, कृषी आधारित उद्योग, पॉलिमर व रसायन आधारित उद्योग, अभियांत्रिकी व अपारंपारिक उर्जेवर आधारित उद्योग, तसेच सेवा आधारित उद्योग या विषयावर खादी व ग्राम उद्योग आयोग येथील तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच बँकर्स कडून लोन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ तरूणांनी घ्‍यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.