वनसंरक्षक कार्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

वनसंरक्षक कार्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

गडचिरोली, दि.१९: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वनसंरक्षक गडचिरोली कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली . याप्रसंगी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी श्री बावस्कर यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये सर्व धर्माचे सैनिक होते असे सांगितले . श्री बिलोलीकर यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण वनसंरक्षणाचे काम करावे असे सांगितले. कार्यक्रमचे अध्यक्ष डॉ.किशोर मानकर यांनी उपस्थितांना संबोधताना शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्षपणा, 18 पगड जातींना जमवून उभारलेलं सैन्य, पर्यावरणा बाबत त्यांची दूरदृष्टी, रयतेचे कल्याण, स्त्रियांबद्दल आदर, गनिमी कावा इत्यादी बद्दल माहिती दिली. कार्यक्रमांमध्ये श्री रायपुरे , श्री प्रमोद मेश्राम, श्रीगुरुदास थेरकर , श्री घोनमोडे, श्री संदीप कांबळे श्री नागोसे, व इतर कर्मचारी उपस्थित होते. श्री राहुल काचमवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.