तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचन कक्षा रूंदावल्यात महाचर्चेतील वक्त्यांचा सूर

तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचन कक्षा रूंदावल्यात महाचर्चेतील वक्त्यांचा सूर

 

भंडारा, दि. 15 : सध्याचे युग हे डिजीटल झाल्याने व सोशल मिडीयाचा प्रभाव वाढल्याने वाचनाची माध्यमे बदलली आहेत.मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचन कक्षा रूंदावल्या असल्याचे मत वाचन आणि तंत्रज्ञान या महाचर्चेतील वक्तयांनी मांडले.

 

ग्रंथोत्सवच्या दुस-या दिवशी आयोजित या महाचर्चेत मातृसेवा संघ् समाजकार्य महाविदयालय नागपूरचे ग्रंथपाल डॉ.प्रिंस आगासे,पटेल कला महाविदयालय मोहाडीचे डॉ.प्रमोद वरखडे , व जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी सहभाग घेतला.तर भंडारा नगरपरिषद मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी अध्यक्षपद भुषविले. समाजमाध्यमांनी व ऑडीओ बुक मुळे वाचन कक्षा विस्तारल्या आहेत .तंत्रज्ञानासह आपण वाचन आनंद घेतला पाहीजे असे डॉ.प्रमोद वरखडे यांनी सांगितले.तर प्रतिलीपी,ई-बुक, व अन्य ॲपमुळे तंत्रज्ञानाने वाचन वाढले. तर सोशल माध्यमांनी वाचनाची गोडी कमी झाली असल्याचे मत शैलजा वाघ दांदळे यांनी मांडले.पुढल्या पिढीत वाचन संस्कार रूजविण्यासाठी पुस्तकांची संगत करावी असे त्यांनी यावेळी सांगितले. विनोद जाधव यांनी सध्याच्या युवकांना प्रेरणात्मक कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुमेंद्र बोपचे यांनी तर आभार सहायक नारनवरे यांनी केले.