संत सेवालाल महाराज यांना गडचिरोली जिल्हा प्रशासनाची आदरांजली

संत सेवालाल महाराज यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

 

गडचिरोली, दि.15: संत सेवालाल महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार संजय रामटेके, नायब तहसीलदार गौरीशंकर चव्हाण, नायब तहसीलदार श्रीमती एस.बी.धकाते, जिल्हा नाझर आशिष सोरते, विठ्ठल चहांदे, आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.