ग्रंथोत्सवात आज परिसंवाद व कवि संमेलन संपन्न

ग्रंथोत्सवात आज परिसंवाद व कवि संमेलन संपन्न

 

भंडारा दि. 14: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा ग्रंथोत्सव 2023 चे आज दि 14 फेब्रुवारी रोजी जकातदार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे उद्घाटन करण्यात आले. भंडारा जिल्हा ग्रंथोत्सवात आज ग्रंथोत्सवात परिसंवाद व कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले. तर उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

‘सामाजिक विकासात ग्रंथालयाची भुमिका’ या परिसंवादामध्ये अध्यक्ष स्थानी मंजूषा सावरकर जेष्ठ साहित्यिका, जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार व सुनिल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी श्रीमती सावरकर यांनी अध्यक्ष स्थानावरून ग्रर्थालयाची भुमिका मांडली. सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याची आवश्यक्ता असून प्रत्येक वाचकाला त्याला आवडणारा ग्रंथ मिळाला पाहिजे असे यावेळी ते म्हणाले.

 

त्यांनतर कवीसंमेलनामध्ये अध्यक्ष स्थानी लखनसिंग कटरे हे होते. तसेच कवी प्रमोदकुमार अणेराव, प्रसेनजित गायकवाड, विनोद गहाणे, सुनिता झाडे व विवेक कापगते यांनी आपल्या कवीता यावेळी उपस्थितांसमोर सादर केल्या.