सिंदेवाही च्या विद्यार्थीनींची ताईक्वांदो स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर निवड..

सिंदेवाही च्या विद्यार्थीनींची ताईक्वांदो स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर निवड..

क्रीडा व युवक सेवा संचालनालय (म .रा .)पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धाअंतरगत शालेय विभागीय स्पर्धा दिनांक ७ व ८ फेब्रुवारी २०२३ जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे घेण्यात आली.या स्पर्धेत नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर तसेच महानगर पालिका अशा सर्व जिल्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डि .के ताईक्वांदो असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. यात २ सुवर्णपदक १ रजतपदक १ कास्यपदक प्राप्त केलेले आहेत . हेमाक्षि गेडाम आनि मानसि आगबत्तनवार यांनी प्रत्येकी ३ जिल्याना हारवून सुवर्ण पदक प्राप्त केले तर यिशिता ढोरे इने रजत पदक आनि धर्य पटेल याने कास्यपदक प्राप्त केले आहे. सुवर्ण पदक विजेत्या मुलि जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे नेतृत्व करनार आहेत .या मुलि सिंदेवाही ताईक्वांदो असोसिएशन चे सचिव आकाश बागलावे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतात.मुलिनि यशाचे श्रेय आईवडील आणि क्रिडा शिक्षकाना दिलेले आहे. तसेच पुडिल स्पर्धेकरिता योगेंद्रजि जयस्वाल,अरविंदजि जयस्वाल , नागलवाडे सर ,विनय खोब्रागडे यांनी सुभेछा दिल्या .