महेश मेश्राम व श्र्वेता खोब्रागडे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

महेश मेश्राम व श्र्वेता खोब्रागडे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

भंडारा दि. 6 : नेहरू युवा केंद्र संगठन महाराष्ट्र व गोवा राज्य तर्फे दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी आभासी माध्यमातून विभागीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भंडारा जिल्ह्यातून महेश यादोराव मेश्राम तालुका लाखांदूर व श्र्वेता खोब्रागडे तालुका पवनी हे विजयी ठरले.

राज्यस्तरीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेकरिता निवड झालेले जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व राज्यस्तरीय स्पर्धेत करणार आहेत असे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी कळविले आहे.