छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अवमान…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अवमान…

कल्पतरू विद्यामंदिर कॉन्व्हेंट ,सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी आज दिनांक २३ जानेवारी सोमवार रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती सिंदेवाही तर्फे ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व बक्षीस वितरण सोहळा हे कार्यक्रमाची सुरुवात झाली.असून या कार्यक्रमाची सुरुवात महापुरूषांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून करण्यात आले. परंतु महापुरूषांच्या प्रतिमेत शिक्षण क्षेत्रात महत्वाचे योगदान असणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,फातिमा शेख, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांचे प्रतिमा नव्हते. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले. मात्र काही वेळातच महाराजांचे फोटो जमिनीवर धुळखात ठेवण्यात आले. बाजुला टि टेबल खाली होते मात्र त्याचे सुद्धा उपयोग झाले नाही. अशा निच प्रकारच्या करण्यात आलेल्या कृत्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाहत्यांमध्ये कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात त्रीव विरोध करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घटनेची सविस्तर माहिती आयोजकांकडून मिळाली नसुन उद्याला संपूर्ण सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात येईल.