भंडारा || तृणधान्यांचा आहार घ्या…..आजार व्याधी दूर पळवा

भंडारा || तृणधान्यांचा आहार घ्या…..आजार व्याधी दूर पळवा

 

भंडारा दि. 17 : ज्वारी, राळा, सावा, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा या तृणधान्यांची माहिती आपल्या सर्वांना आहे. मात्र सध्या जीवनशैली विषयक आजाराने सर्वजण त्रस्त आहेत. डॉक्टरांच्या पायऱ्या झिजवणे, जिमसाठी वेळ काढणे व उत्तम आरोग्यासाठी गोळ्या-औषधांचा शरिरावर मारा करणे…..वयाच्या तिशी नंतरच शरीर आजारांनी ग्रस्त होत आहे.

 

तर सोपा उपाय काय ?

 

तर तृणधान्यांचा ज्याला इंग्रजीत मिलेटस म्हणतात त्यांचा वापर आहारात वाढविणे , जुन्या काळात ज्वारीची भाकर हा दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग होता. ‘जुने ते सोनं’ सोडून चिप्स, कुरकुरे, मॅगीच्या मागे लागत आहार बदललला गतिमान पिढीने तृणधान्याची साथ सोडली.

 

तर हायपरटेन्शन, बिपी, ह्यदयांशी संबंधित आजार… व्याधी कोणतीही असली तरी आहार हाच मुख्य गाभा. आहार विषयक अनेक सुभा‍षित आहेत. त्यात एक म्हण आहे. ‘कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबीवाणी’ अशी म्हण जुन्याकाळात होती.

 

2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. कृषी विभागाने यासाठी विविध मार्गाने तृणधान्याचा उपयोग आहारात करण्यासाठी नागरिकांना प्रेरीत करणे सुरू केले आहे.

 

तर कोणती तृणधान्ये महत्वाची आहेत

 

ज्वारी- भातापेक्षा जास्त पोषक, तंतुमय म्हणजे पोट साफ करणारी, फॉलीक ॲसीड पुर्ण, कॅल्शीयम यक्त.

 

सावा- हा पांढऱ्या रंगाचा तृणधान्य, लौनोलिक ॲसीड, ओमिलक ॲसीडचा उत्तम स्तोत्र, रक्तदाब व मधुमेहावर गुणकारी, आतळ्याच्या आजारावर गुणकारक.

 

बाजरी- कॅल्शीयम, हिरमोन अ, ब आणि फॉस्फरस अधीन मात्रात उपलब्ध, बाजरीची खिचडी ही प्राकृतीकच आवडती आहे.

 

नाचणी- नाचणी तर या तृणधान्यांतील हुकमाचा एकाच नाचणीतर मोठ्या प्रमाणावर कॅल्शीअम, प्रथिने, फॉस्फरस नाचणीचे तर अनेक प्रकार करता येतात. इडली, जसे अप्पे, चकली बनविता येतात.

 

राळा- हा भगरीसारखा दिसतो. कॅल्शीअम, रक्तामध्ये साखर ‍नियंत्रीत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, नाम ॲलर्जीक व पचनास हलके.

 

वरई (भगर)- स्तनाच्या कर्करोगावर गुणकारी, ब्लुटेनयुक्त, रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते, स्तनाचे कर्करोगावर गुणकारी.

 

राजगिरा- प्रथिनाचा चांगला स्तोत्र, कॅल्शीयम, लोह, पोटोशियम झिंक मुलद्रव्ये भरपूर त्वचा व केसाच्या आरोग्यास उपयुक्त.

 

तृणधान्याचे महत्त्व आहेच. मात्र त्याचा कमी झालेला आहारातील समावेश या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या वतीने वाढवणे हे आरोग्यदायी ठरेल. तर मग आजारापासून तृणधान्यांचा वापर आहारात वाढवा.