भंडारा || राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात साजरा

भंडारा || राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात साजरा

 

भंडारा दि. 16 : नेहरू युवा केंद्र भंडारा तर्फे दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे “राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकनंद व स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. सुमंगल वातावरणात व्यासपीठावरील सन्माननीय सर्व मान्यवरांचे स्वागत गीत व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला उद्घाटक सह.प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी युवा दीन व रस्ता सुरक्षा अभियानया विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी मंजुळाई फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक हेमंत ब्राह्मणकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र विषय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आठवले समाजकार्य महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ.नरेश कोलते, प्रमुख संचालिका आठवले समाजकार्य महाविद्यालय अतिथी किरण रोटेले, काजोल रोटेले , सहा.प्रादेशिक परिवहन निरीक्षक सूरज पवार, प्राध्यापक डॉ. चंदू पाटील, कार्यक्रम प्रमुख सहायक नेहरू युवा केंद्र भंडारा रमेश अहिरकर, प्राध्यापिका सरला शनिवारे, सुर्यकांत मरघडे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्र भंडारा च्या राष्ट्रीय स्वयंसेवक कोयल मेश्राम यांनी केले तर आभार प्राध्यापिका आम्रपाली भिवगडे यांनी मानले.