चुकीच्या धोरणामुळे कॉंग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला-हेमंत पाटील

चुकीच्या धोरणामुळे कॉंग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला-हेमंत पाटील

मुंबई, १४ जानेवारी २०२३

चुकीच्या राजकीय, संघटनात्मक धोरणामुळे कॉंग्रेसने पुन्हा एकदा एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक रिंगणात उभे असलेले पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसने समर्थन द्यावे,असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत कॉंग्रेसने दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा आत्मघातकी आहे. अशा नाजुक वेळी पक्षाची पडझड रोखण्यासाठी दृरदृष्टिने निर्णय घेत कॉंग्रेसने सत्यजीत यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.

 

अखेरच्या क्षणी भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेत सत्यजीत यांच्या सर्वपक्षीय पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.सत्यजीत यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या पावलावर पावूल ठेवत सामाजिक, राजकीय धडे गिरवले. राजकीय भविष्याची चिंता सतावत असल्याने कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांच्या वडिलांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली होती,असा दावा देखील पाटील यांनी केला आहे.सत्यजीत तांबे हे हेमंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत, हे विशेष. भाजप तसेच संघावर टीका करणारे, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय तरूण नेतृत्व सत्यजीत यांनी भाजप तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठिंबा का मागीतला? याचे चिंतन कॉग्रेसने करीत अंतर्गत गटबाजी संपवण्याच्या दिशेने पावले टाकण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले.