नियोजन समितीच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा यंत्रणांनी आयपास प्रणालीवर प्रस्ताव अपलोड करावे

नियोजन समितीच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा यंत्रणांनी आयपास प्रणालीवर प्रस्ताव अपलोड करावे

 

भंडारा, दि. 30 : विविध विकासकामांच्या प्रस्ताव दाखल करतांना ते नियोजन विभागाच्या आयपास प्रणाली वर अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिल्या.जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे,उपवनसंरक्षक राहूल गवई,जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

गेल्या बैठकीतील इतीवृत्तांवर यावेळी चर्चा झाली. विकासकामांचे प्रस्ताव देतांना ते शक्यतो अचुक व निर्दोष असावेत .अचुक प्रस्ताव देवून तेवढयावरच न थांबता यंत्रणांनी वरिष्ठ पातळीवर त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी दिले.