औरंगाबाद (सिल्लोड) येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा – कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही

औरंगाबाद (सिल्लोड) येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा – कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे “राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३” दि. १ ते ५ जानेवारी, २०२३ रोजी आयोजित होणार आहे. या प्रदर्शनात एकूण ६०० दालन असून कृषी व संलग्न विभागाच्या दालनात विद्यापिठाच्या सर्व विभागांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषी व अन्न प्रक्रिया, लागवड पध्दती, जैविक तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पशुसंवर्धन आदी बाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शेतक-यांना प्रदर्शनाचा आणि चर्चासत्राचा लाभ होणार आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनी कृषि निगडीत मंडळीनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. व्ही. जी. नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपुर यांनी केले आहे.जास्तीत जास्त शेतकरी बंधु सहभाग नोंदवावा अशी विनंती डॉ.विजय सिडाम (विषय विशेषतज्ञ विस्तार शिक्षण ) केले आहे.