सुशासन सप्ताहानिमीत्त होणार बेस्ट प्रॅक्टीसेसवर चर्चा

सुशासन सप्ताहानिमीत्त होणार बेस्ट प्रॅक्टीसेसवर चर्चा

भंडारा, दि. 21 : शासकीय कामात पारदर्शकता आणून ती अधिक वेगवान व लोकाभिखुख व्हावीत यासाठी देशभरात 19 ते 25 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रशासनातील बेस्ट प्रॅकटीसेसचे सादरीकरण सर्व विभागप्रमुखांसाठी दिनांक 23 डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे आयोजित केले आहे. यामध्ये ज्या शासकीय विभागांनी लोकाभिमुख प्रशासनासाठी राबविलेल्या चांगल्या कार्यपध्दतीवर चर्चा होणार असुन कल्पनांची देवाणघेवाण होईल. प्रशासनाचा प्रभाव अधिक वाढवण्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचा धांडोळा या निमीत्ताने घेण्यात येणार आहे.