कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या विहिरीला विज जोडणीसाठी महावितरण द्वारा एक खिडकी प्रक्रिया सुरू

कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या विहिरीला विज जोडणीसाठी महावितरण द्वारा एक खिडकी प्रक्रिया सुरू

 

चंद्रपूर, दि. 19: जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरीला विज जोडणीसाठी तसेच लाभार्थ्यांच्या सुविधेकरीता महावितरण कार्यालयाने एक खिडकी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये विहिरीला नवीन विद्युत जोडणीकरीता अर्ज करणे, डिमांड भरणे, व्यक्तिगत तसेच ऑनलाईन अर्ज करणे आदी घटकांचा समावेश असणार आहे.

 

संबंधित लाभार्थ्यांना विद्युत जोडणीची आवश्यकता असल्यास एकल खिडकी संपर्क कार्यालय, केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्र, महावितरण कार्यालय, बल्लारपूर रोड, विद्युत भवन जवळ, बाबुपेठ, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.