स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव 2023”

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव 2023”

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे “राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव 2023” दि. ०१ ते ०५ जानेवारी, २०२३ रोजी आयोजित करावयाचे निर्देश आहे.

 महोत्सवाचे यशस्वी आयोजनाकरीता श्री. दशरथ तांभाळे, संचालक, आत्मा(मो.नं. ९४२३००९४९२) यांची राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी तसेच श्री. तुकाराम मोटे, कृषि सहसंचालक, (वि.प्र.-३) (मो.नं. ९४२२७५१६००) यांची समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 सदर प्रदर्शनात एकूण १०*१० स्के.फु.चे ६०० दालन असून त्यापैकी ३६० दालने शासकीय योजना प्रकल्पासाठी असून उर्वरित खाजगी संस्थाकरिता आहे.

 सदर महोत्सवात सायंकाळी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 त्यानुषंगाने कृषि विभागाचे सर्व संचालक, प्रकल्प संचालक पोक्रा, प्रकल्प संचालक स्मार्ट,महाबीज व महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ या शासकीय यंत्रणेद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 सदर महोत्सवात कृषि संलग्न विभागांचाही सक्रीय सहभाग असणार आहे. याकरिता राज्यातील चारही कृषि विद्यापीठे ,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग , महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ, महाबीज,साखर,भूजल सर्वेक्षण, सहकार या सर्व विभागांना याबाबत पत्र देवून त्यांचे सहभागाविषयी आवाहन करण्यात आलेले आहे.

 उपरोक्त विभागाबरोबरच महिला बाल कल्याण विकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनात्ती अभियान, आदिवासी विकास विभाग,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, यशदा, सारथी, बार्टी या विभागानाही सदर सर्व विभागांना याबाबत पत्र देवून त्यांचे सहभागाविषयी आवाहन करण्यात आलेले आहे.

 राज्यातील चारही कृषि विद्यापीठांना दोन स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये ८००० स्के.फु. चे एक बंदिस्त दालन असून एक मोकळे दालन आहे. या दालनात विद्यापिठाच्या सर्व विभागांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके, Live Demonstration, विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषि व अन्न प्रक्रिया, लागवड पध्दती, जैविक तंत्रज्ञान, पिक संरक्षण, पशुसंवर्धन, इत्यादी बाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शित करणेबाबत कळविलेले आहे.

 सदर महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिके जसे की, आंबा, संत्रा, मोसंबी, भेंडी, टोमाटो, सोयाबीन, कापूस मका इ.पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

 कृषि विभागाअंर्तगत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, स्मार्ट, पंजाबराव देशमुख जैविक मिशन, माहिती विभाग, शेतकरी मासिक, पीएमएफएमई, कृषि यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञान, आदर्श पाणलोट क्षेत्र मॉडेल, पोक्रा मार्फत वातावरण अनुकूल तंत्रज्ञान अवलंबलेले आदर्शगाव,सिंचन पद्धती, पोक्रा इत्यादींना स्वतंत्र दालने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 कृषि प्रदर्शन आणि चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी दररोज कोणत्या जिल्हयांचे शेतकरी कधी येतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

 कृषि व संलग्न विभागाच्या शेतकरी सहली, शेतकरी प्रशिक्षणे इत्यांदींच्या माध्यामातून शेतक-यांना प्रदर्शनाचा व चर्चासत्राचा लाभ देण्यात येणार आहे.

 आयुक्त (शिक्षण) यांना राज्यातील सर्व माध्यमिक,उच्च माध्यमिक,महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली प्रदर्शन कालावधीत सिल्लोड येथे आयोजित करणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

 राज्यातील चारही विद्यापीठाच्या कुलगुरूना त्यांच्या अंतर्गत सर्व शासकीय, अशासकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा प्रदर्शन कालावधीत सिल्लोड येथे आयोजित करणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

 प्रचार प्रसिद्धी-

१. दि.१३.१२.२०२२ रोजी मा.आयुक्त (कृषि) यांनी सर्व संचालक, विभागिय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विकास अधिकारी यांचे सभा घेऊन सर्वाना सदर महोत्सवाची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

२. सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील सदर महोत्सवाची प्रचार प्रसिद्धी व उस्फूर्त सहभागाबाबत आवाहन करण्यात आले आहे.

३. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व सन्मानीय खासदार,आमदार ,पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना सदर महोत्सवात सहभागी होणेबाबत स्वतंत्र पत्र देणेबाबत निर्देश देण्यात आले आहे.

४. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रावर सदर महोत्सवाच्या प्रचार प्रसिद्धीचे भित्तीपत्रके प्रदर्शित करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

५. जिल्ह्यातील सर्व गावात दवंडी पिटणे तसेच ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर सदर महोत्सवाच्या प्रचार प्रसिद्धीचे भित्तीपत्रके प्रदर्शित करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

६. राज्यातील सर्व निविष्ठा सेवा पूरवठादार जसे की, बियाणे उत्पादक, बियाणे विक्रेते, रासायनिक खत उत्पादक व विक्रेते ,किटकनाशके उत्पादक व विक्रेते तसेच यंत्र सामुग्री विक्रेते इ. यांना उस्फूर्त पणे सहभागाबाबत आवाहन करण्यात येत आहे.

 निधी उपलब्धता-

अ.क्र. विभाग उपलब्ध करून द्यावयाचा निधी रक्कम रु.(लाखात)

कृषि विभाग-

१. कृषि संचालक, फलोत्पादन २०.००

२. कृषि संचालक ,विस्तार व प्रशिक्षण २०.००

३. कृषि संचालक, प्रक्रिया व नियोजन २०.००

४. कृषि संचालक, आत्मा २०.००

५. संचालक ,महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ ,पुणे २०.००

६. कृषि संचालक,निविष्ठा व गुणनियंत्रण २०.००

इतर यंत्रणा-

अ.क्र. विभाग उपलब्ध करून द्यावयाचा निधी रक्कम रु.(लाखात)

१. प्रकल्प संचालक,नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा),मुंबई २०.००

२. प्रकल्प संचालक,मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट),पुणे. २०.००

३. व्यवस्थापकीय संचालक,

महाराष्ट्र कृषि उद्योग महामंडळ, मुंबई २०.००

४. व्यवस्थापकीय संचालक,

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला २०.००