बहुजन समाज पार्टीतर्फे विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण /  संविधान परिषदेत विद्यार्थ्यांचा गौरव 

बहुजन समाज पार्टीतर्फे विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण /  संविधान परिषदेत विद्यार्थ्यांचा गौरव 

सिंदेवाही -बहुजन समाज पार्टी तालुका सिंदेवाहीच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,बिरसा मुंडा,डा .बाबासाहेब आंबेडकर ,डा .अब्दुल कलाम व बहुजन नायक कांशीराम या महापुरुषांच्या जीवनावर आधारित तालुकास्तरीय प्रश्न -मंजूषा परीक्षेतील विजेत्या विद्याथ्यांना रोख पुरस्कार ,महापुरूषांचे पुस्तक व प्रमाणपत्राचे वितरण संविधान सन्मान परिषद कार्यक्रमात बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अतिथी डा .विनोद नागदेवते ,प्रा .चंद्रमणी घोनमोडे व इंजि .संजय मगर यांच्या हस्ते नुकतेच वितरण करण्यात आले .

या तालुकास्तरीय प्रश्न -मंजुषा परीक्षेत अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय पुरस्कार विजेते खातगावचा पियुष बौद्धप्रकाश डांगे ,सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाहीचा अमर एकनाथ कुमरे व पेटगावची प्रतिक्षा भाऊराव धारणे ह्यांना आयोजकांच्या वतीने रोख पुरस्कार ,भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले .

तर प्रोत्साहनपर बक्षिसामध्ये रोख पुरस्कार ,भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहीचा सुमित तंतपाल नागदेवते ,कल्पतरु इंग्लिश मिडीयम स्कुल सिंदेवाहीचा सम्यक मिलिंद गेडाम ,सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीची स्नेहाल भगवान मेश्राम ,महात्मा फुले विद्यालय सिंदेवाहीचा आदित्य नागदेवते ,सर्वोदय विद्यालय सिंदेवाहीचा प्रणय अशोक कोलते यांचाही गौरव करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन समाज पार्टीचे नंदू खोब्रागडे ,इंजि .सचिन शेंडे ,डा .रेवानंद बांबोळे ,शीतलताई शेंडे तेजस डोंगरे ,बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे प्रा .भारत मेश्राम , मायावती फेन्स क्लबच्या आम्रपाली बागेसर ,शिवाजी बिरसा आंबेडकर युवा ब्रिगेडचे इंजि . अनिकेत रामटेके ,कुंदन गजभिये ,आयरन लेडी स्पोर्टींग क्लबच्या नंदिनी मेश्राम ,रजनी टेकाम व प्रणाली निहाटे आदींनी सहकार्य केले .