शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता एकविध क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांची सभा

शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता एकविध क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांची सभा

 

गडचिरोली, दि.25 : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा एकविध क्रीडा संघटनांच्या तांत्रिक सहकार्याने करावयाचे असल्याने यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नव्याने समाविष्ठ झालेले युग मुन दो, टार्गेट बॉल, कुराश, म्युजिकल चेअर, पेन्टाक्यू, चॉयक्वांदो, फिल्ड आर्चरी, हुप क्वॉन दो या क्रीडा प्रकारांचे जिल्हास्तर व विभागस्तरीय स्पर्धा आयोजन करण्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे. उपरोक्त स्पर्धाचे यशस्वी आयोजन व तांत्रिक जबाबदारी सांभाळण्याकरीता वरील क्रीडा प्रकाराच्या पदाधिकारी यांची सभा सोमवार दि. 28/11/2022 ला सकाळी 11.30 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. करीता वरील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सभेकरीता उपस्थित राहावे. जेणेकरुन सदर स्पर्धेचे राज्यस्तर स्पर्धेपुर्वी आयोजन करणे सोईचे होईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.