भारत आंतरराष्ट्रीय मेळा 2022 भंडारा जिल्ह्यातील स्टॉलला उद्योग मंत्री यांची भेट

भारत आंतरराष्ट्रीय मेळा 2022 भंडारा जिल्ह्यातील स्टॉलला उद्योग मंत्री यांची भेट

 

भंडारा, दि. 23: भारत आंतरराष्ट्रीय मेळा 2022 चे आयोजन नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे दिनांक 14 ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यातील उद्योजक मे.धनाचंल स्मॉल इंटरप्रायजेस चे प्रॉफायटर हर्षना दुर्गाप्रसाद वहाने मु.पो. तुमसर यांचे फळ प्रक्रिया उद्योगा अंतर्गत आवळ्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री उदय सांवत यांनी भेट देवून उद्योजकाचे मनोबल वाढविले तसेच यावेळी उद्योग उर्जा व खनन विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय भंडारा यांच्या मार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत सन 2014-15 या वित्त वर्षात विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा तुमसर यांच्या अर्थसहय्याने फळ प्रक्रिया उद्योगा अंतर्गत आवळ्यावर प्रक्रिया करुन आवळा लोणचे, मुरबा, कॅनडी, सुपारी, पावडर, मुख्यसुध्दी, ज्यूस, सरबत, लाडू इत्यादी पदार्थाचे उत्पादन घेवुन हर्षना दुर्गाप्रसाद वहाने मु.पो.तुमसर यांनी उद्योग सुरु केला व 15 लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला.