भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीकरीता 28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार – तहसिलदार अरविंद हिंगे

भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीकरीता 28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार – तहसिलदार अरविंद हिंगे

 

भंडारा, दि. 15 : भंडारा तालुक्यातील माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या खरबी, कोरंभी, गणेशपूर, सिल्ली, मांडनगाव, आमगाव, दवडीपार बा, चिखली, इंदुरखा, खमारी, दिघोरी, मुजबी, ठाणा, दवडीपार बे, खैरी बे, कवलेवाडा, बासोरा, सावरी ज, नांदोरी, साहुली, कवडसी, शहापूर, मोहदुरा, हत्तीडोई, जाख, बेला, पांढराबोडी, कोथुर्णा, गराडा खु, पिंडकेपार, सिरसी, कारधा, डोडमाझरी टे, टेकेपार मा, वाकेश्वर, चिखलपहेला, मालीपार, नवरगाव व खोकरला या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता राज्य निवडणूक आयोग यांच्या कडून निवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार आहे.

 

ग्रामपंचायती मधील ज्या कोणत्याही उमेदवारास व नागरिकास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरीता राखून ठेवलेल्या जागेवर निवडणूक लढवायची आहे. अशा उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे अर्ज ऑनलाईन भरून आवश्यक दस्तऐवजासह तहसिल कार्यालय भंडारा येथील निवडणूक शाखेत सादर करावे, असे साकोली तहसिलदार अरविंद हिंगे यांनी कळविले आहे.