1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघाच्या प्रारूप छायाचित्र मतदार याद्या प्रसिद्ध

1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघाच्या प्रारूप छायाचित्र मतदार याद्या प्रसिद्ध

चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर : 1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्या सखोल प्रकारे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार अद्यावत करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 70-राजुरा, 71-चंद्रपूर (अ. जा), 72-बल्लारपूर, 73-ब्रह्मपुरी, 74- चिमूर व 75-वरोरा या 6 विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्या दि. 9 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये, जिल्ह्यातील सर्व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांची कार्यालये, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या असून पदनिर्देशित ठिकाणी मतदारांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत. तरी सर्व संबंधित मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे यांनी कळविले आहे.