8 नोव्हेंबर रोजी विधीसेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा…  

8 नोव्हेंबर रोजी विधीसेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा…  

चंद्रपूर, दि. 3 : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण यांच्यामार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण अभियान 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात होणा-या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागामार्फत माहितीचे स्टॉल लावण्यात येतील. त्यामुळे सर्व नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन विविध विभागामार्फत दिल्या जाणा-या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.