खरीप हंगाम सन 2022-23 ची हंगामी पीक सुधारीत पैसेवारी जाहीर

खरीप हंगाम सन 2022-23 ची हंगामी पीक सुधारीत पैसेवारी जाहीर

गडचिरोली, दि.02 : गडचिरोली जिल्हयात एकूण 1689 गावे असून,खरीप पिकाची गावे 1548 आहेत.व एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 08 आहेत.त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे 45 आहेत.सदर खरीप पिक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले खरीप गावे 0 असून,50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकुण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1511 आहेत.अशा प्रकारे एकूण 1511 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्हयाची खरीप हंगाम 2022-23 या वर्षाची सुधारीत हंगामी पैसेवारी 0.67 आहे.असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.