सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचना

सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचना

गडचिरोली,दि.20: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे व प्रवाशांचा माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना प्रवास करतांना कोणतीही अडचण आल्यास dyrto.33-mh@gov या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.