क्रीडा प्रबोधीनीमध्ये निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया सुरू

क्रीडा प्रबोधीनीमध्ये निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया सुरू

भंडारा दि. 08 :क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील क्रीडा प्रबोधीनीमध्ये प्रवेशाकरीता सरळ प्रवेश प्रकीया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत अॅथलेटीक्स या खेळातील उदयन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा प्रबोधीनीमध्ये प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यस्तरावर प्रथम 6 क्रमांकावर असलेल्या 8 ते 14 वर्षाच्या आतील खेळाडूंनसाठी कौशल्य चाचण्यांचे आयोजन विभागस्तरावर करण्यात येत आहे.

निवासी व अनिवासी प्रवेशाकरीता कौशल्य चाचण्यांचे आयोजन विभागस्तरावर करण्यात आले आहे. कौशल्य चाचण्या आयोजनाचा कार्यक्रम 13 ते 14 सप्टेंबर 2022 ला सकाळी 11 वाजतापासुन विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर, नागपूर येथे केले आहे. सरळ प्रवेशाकरीता व कौशल्य चाचणीकरीता विहीत नमुन्यात अर्ज 12 सप्टेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्मतारीख दाखला इ.) माहितीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमती आशा मेश्राम यांनी केले आहे.