विविध पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिम

विविध पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिम

गडचिरोली, दि.05: सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 12 वी शाखेतील व राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर वैधता प्रमाणपत्राबाबत सामान्यत: 5 महिन्याचा आत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विद्यार्थ्यांनी विहीत नमून्यात ( ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताएवेज व MH-CET, JEE, NEET, B.ED CET, M.ED CET, LLB CED, CED, B.SC AGRI CET, व MBA CET या सारख्या इतर प्रवेश पात्रता परीक्षाकरीता भरण्यात आलेल्या अर्जाची प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी.रस्ता, कॉम्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे असे उपायुक्त तथा सदस्य,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.