वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसचा मोफत प्रवास
Ø वनमंत्री मुनगंटीवार यांनी केले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन !
चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेच्या माध्यमातून राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. त्यांनी दिलेल्या संस्कारातून हा समाज खंबीरपणे उभा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या निर्णयाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा भाजपा-शिवसेना युती शासनाने केलेला हा सन्मान महत्वपूर्ण तसेच औचित्यपूर्ण आहे, असेही वन व सांस्कृतीक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.