उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक पत्नी व पाल्यांना गौरव पुरस्कार

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक पत्नी व पाल्यांना गौरव पुरस्कार

भंडारा, दि. 24: विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी व पाल्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणिय काम करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य, विधवांच्या पाल्यास शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता 10 वी 12 वी बोर्डात 90% पेक्षा अधिक गुण मिळाले असतील.

अशा माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावे. त्यांनी त्याचा अर्ज, मार्कशिट व बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन दिनांक 10 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, भंडारा येथे अर्ज सादर करावा. अधिक माहिती करीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.