सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

भंडारा, दि. 14 : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली त्या अनुषंगाने संपूर्ण भारत भर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय भवन येथे विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात  समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्या करिता भंडारा येथे उपस्थित होते. त्यांचे सोबत प्रादे. उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड हे उपस्थित होते.

मान्यवरांना वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या वतीने लेझिम द्वारे कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. त्यांचे औक्षवण करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत तीन रंगी आकाश फुगे मा. आयुक्त महोदयांच्या हस्ते सोडण्यात आले.

आयुक्त महोदयांना प्रशासनातील आयडल म्हणून पुरस्कृत केल्याने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा च्या वतीने प्रादेशिक उपायुक्त डॉ सिद्धार्थ गायकवाड यांनी स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच आयुक्त महोदयांचे भंडारा जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले असल्याने भंडारा जिल्ह्यातील जवळपास 20 ते 25 मागासवर्गीय संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. आयुक्त महोदयांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.  सामाजिक न्याय मध्ये वसतिगृह हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आजची ही मुले भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहेत. म्हणून या घटका वर मेहनत घेणे त्यांची काळजी घेणे महत्वाचं आहे. संवाद उपक्रमांतर्गत अधिकाऱ्यांना महिन्यातून एकदा मुलांचे वसतिगृहात रात्रीचे वेळी मुक्कामी राहणे गरजेचे आहे म्हणजेच मुलांच्या समस्या त्यांना समजतील असे ते म्हणाले. संपूर्ण कार्यक्रमास हजारोच्या संख्येने विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमांस मा आर. डी.आत्राम उपयुक्त सि. व्ही. सि. भंडारा हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहा. आयुक्त यांनी केले. तर आभारप्रदर्शन सचिन मडावी संशोधन अधिकारी यांनी केले.