स्वराज्य महोत्सव अंतर्गत बालगोपाळांची पंगत 

स्वराज्य महोत्सव अंतर्गत बालगोपाळांची पंगत 

चंद्रपूर १२ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत बालगोपाळांची पंगत कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विभागातर्फे प्रत्येक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते.

स्वराज्य महोत्सव अंतर्गत शाळा / अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे ही मोहीम घेण्याचे निर्देशित आहे. त्यानुसार मनपा शाळेतील अनौपचारिक शिक्षा घेणाऱ्या बालकांसाठी बालगोपाळांची पंगत आयोजीत करण्यात आली.

यात बालगोपाळांना सकस आहार देण्यात आला. सदर कार्यक्रमात गोपाळांना केळी व खिचडी वाटप करण्यात आले. तसेच मुलांचा उत्साह बघता रक्षा बंधनचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. मनपा आरोग्य विभागामार्फत डॉ.वनिता गर्गेलवार यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार, शामल रामटेके, शौमिक फुलकर, सान्वी भलमे, हर्षिका भोयर,पुर्विक अलाम,लाभांश भोयर, स्वराज मेश्राम, दिव्यांश नाईक,प्रेमलता रहांगडाले, संगीत गुरनुले, प्रेमीला भलमे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.