स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रम

भंडारा दि. 3 : शासनाच्या निर्देशनान्वये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात संबंधाने व संदिप कदम जिल्हाधिकारी भंडारा व विजय मून मूख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचे मार्गदर्शक सूचनानूसार पंचायत समिती भंडारा येथील सभागृहात सौ. रत्नमाला चेटूले, सभापती, प्रशांत खोब्रागडे, उपसभापती व प्रेमदास वनवे, श्रीमती नंदाताई झंझाड जिल्हा परिषद सदस्य, सन्मानिय पंचायत समिती सदस्य व भंडारा तालुक्यातील सरपंच आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. श्रीमती संघमित्रा कोल्हे यांच्या उपस्थितीत दिनांक 2 ऑगस्ट 2022 ला पंचायत समिती सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रचार व प्रसार हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी श्रीमती संघमित्रा कोल्हे, तहसिलदार अरविंद हिंगे, यांनी उपस्थित होवून मार्गदर्शन केले. सहा. गटविकास अधिकारी प्रमोद तिडके, सभापती रत्नमाला चेटूले यांनी स्वातंत्र्याचा महोत्सव हर घर तिरंगा लावण्यासंबंधी सर्वांना आवाहन केले. तिरंगा प्रेमदास वनवे जि. प. सदस्य यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवासंबंधी मार्गदर्शन केले.

तसेच पंचायत समिती सदस्य सिमा रामटेके व जयश्री सतदेवे सरपंच करचखेडा, बाबूलाल भोयर, सरपंच, बोरगांव खूर्द तथा अध्यक्ष सरपंच संघटना इतर सरपंचानी सुध्दा विचार मांडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सूखराम पडोळे, विस्तार अधिकारी शिक्षण पं. स. भंडारा यांनी केले.