भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त

सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

भंडारा, दि. 13 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे उदया सकाळी 8.00 वा. सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन शालेय विद्यार्थ्यांचे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

समता रॅली ही सामाजिक न्याय भवन येथून राजीव गांधी चौक-मुस्लीम लायब्ररी चौक मार्गे त्रिमुर्ती चौक येथे येईल व येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळी 10.00 वा. पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुनिल मेंढे, अध्यक्ष, जिल्हा परिषद गंगाधर जिभकाटे , जिल्हाधिकारी, योगेश कुंभेजकर ,जिल्हा पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती श्री.आव्हाड व इतर सन्माननीय निमंत्रीत मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 

समता रॅलीत भंडारा शहरातील जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा तसेच त्रिमुर्ती चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुख्य कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.