झेप लोकसंचालित साधन केंद्र पालांदूरची सर्वसाधारण सभा संपन्न

झेप लोकसंचालित साधन केंद्र पालांदूरची सर्वसाधारण सभा संपन्न

भंडारा, दि. 16 : महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा द्वारा संचालित झेप लोकसंचालित साधन केंद्र, पालांदूर यांची 15 जून 2022 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जि. प. सदस्य सरिता कापसे, अध्यक्षस्थानी झेप लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष रोहिणी कोरे, प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य योगिता झलके, खुमारी येथील सरपंच कल्पना सेलोकर उपस्थित होते.

मार्गदर्शक म्हणून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, नरेगाचे विपीन कुराडे, कौशल्य विकासच्या मिरा मांजरेकर, लाखनी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रिकर, पशूसंवर्धन अधिकारी लाखनी गुणवंत भडके उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी झेप लोकसंचालित साधन केंद्राच्या सचिव अर्चना फुंडे, निरुता कुसराम, व्यवस्थापक वंदना भिवगडे, लेखापाल धनंजय चौधरी, सहयोगीनी रिता भेंडारकर, चंद्रप्रभा बावणे, मंदा फुलेकर, ज्योती कुंभरे, सरिता तिरपुडे, पुष्पा हेमने, संध्या गोटेफोडे, नंदा चोहले, ज्ञानेश्वरी मेंढे, ज्योत्सना नंदेश्वर, शितल मेश्राम, छबिता खोब्रागडे सहकार्य केले.