कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” किसान मेळावा संपन्न

कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” किसान मेळावा संपन्न

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा चंद्रपूर कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व कृषी विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून हि मोहीम संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत किसान शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करून शेतकरी बांधवांना थेट दूरचित्रवाणी द्वारे संबोधित केले. तसेच भारतामधील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नैसर्गिक शेती यांत्रिकीकरण सर्वोत्तम कृषी पद्धती भारत सरकारच्या विविध योजना आणि पशुधन आरोग्य तपासणी या विषय संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर ए व्ही कोल्हे सहयोगी संशोधन संचालक विभाग कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही उद्घाटक आर.जे.मनोहरे कृषी उपसंचालक कृषी विभाग चंद्रपूर लाभले प्रमुख उपस्थिती मध्ये डॉक्टर सुरपाम पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही ए.आर.महल्ले तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही आणि कृषिभूषण शेतकरी हेमंत शेंद्रे हे उपस्थित होते सदर कार्यक्रमामधे प्रतिभा अरुण खेडकर आणि अर्चना हेमराज पांडव या गृहउद्योग गटातील होतकरू महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर व्हि.एन.शिडाम कृषी चे शास्त्रज्ञ यांनी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञान कृषी पद्धती एकात्मिक शेती व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करून ‘भागीदारी प्राथमिक तर हमारी’ या मोहिमेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. मनोहरे यांनी महाराष्ट्रातील कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी महिला उद्योजक निर्माण व्हावे जैविक संघटना कृषी क्षेत्रात मध्ये वापर करावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर यांनी पशुधनाचे महत्त्व व त्यांच्या आरोग्याच्या समस्या व निराकरण विषयी मार्गदर्शन केले डॉक्टर सोनाली लोखंडे यांनी भरडधान्य व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे मूल्यवर्धन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले अध्यक्ष मार्गदर्शन नंबर दे डॉक्टर कोल्हे यांनी बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादनावर होणारे परिणाम तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव या वेळेत योग्य व्यवस्थापनाविषयी तसेच कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या कृषी अवजारे बँक मध्ये उपलब्ध असलेली यंत्रे व यांत्रिकीकरणाच्या तर विविध पद्धती व महत्व व याविषयी सखोल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम डॉक्टर व्ही.जी.नागदेवते कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बचत गटातील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून गटामार्फत मालाची विक्री प्रदर्शन करण्यात आली या कार्यक्रमाला 15 ही तालुक्यातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी रग रग त्या उन्हात आपली उल्लेखनीय उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिडाम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बिटिएस, डंबोले ,बारसागडे ,चव्हाण यांनी परिश्रम घेतले