भोगवटदार वर्ग-2 धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत 7 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे

भोगवटदार वर्ग-2 धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत 7 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे

भंडारा, दि. 4 : भंडारा जिल्ह्यातील भूमिधारी वर्ग-2 चे जमिनी भूमिस्वामी वर्ग-1 करण्यात आले. परंतु काही जमिनी अजून पर्यंत वर्ग-1 करण्यात आलेल्या नाही.  शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब दिनांक 08 मार्च 2019 अन्वये अंतिम दिनांक 7 मार्च असून त्यानंतर आलेल्या कृषिक जमिनीच्या प्रस्तावावर 75टक्के रक्कम शासन जमा करावी लागेल. रहिवासी प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी 75 टक्के व रहिवासी प्रयोजनासाठी कब्जेहक्काने धारण केलेल्या जमिनी यांना 60 टक्के एवढी रक्कम शासन जमा करावी लागेल.

 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 2019 नुसार कृषिक, निवासी वाणिज्यिक अथवा आद्यौगिक प्रयोजनासाठी भोगवटदार वर्ग-2 धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत 7 मार्च पर्यंत तहसीलदार यांचेकडे प्रस्ताव सादर करावे, असे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.