जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेचे सोमवारी उदघाटन

जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेचे सोमवारी उदघाटन

सिंदेवाही , मिथुन मेश्राम – 9923155166

चंद्रपूर | शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे उदघाटन सोमवारी सकाळी 10 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, एकूण ७६ हजार २५ मुलांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी दिली.

जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा मृत्यूदर तीस टक्के आसपास आहे. आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांच्या भविष्यासाठी कवच-कुंडल होण्याच्या दृष्टीने लस घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.