मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेमध्ये विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण

मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेमध्ये विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण

चंद्रपूर, ता. २६ : शहर महानगरपालिकेच्या बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये येथे आजादी का अमृत महोत्सवाचे निमित्त साधून संविधान दिनानिमित्त मागील 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी करण्यात आले. दरम्यान, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप आवारी, नगरसेविका ज्योती गेडाम, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गौरकर आणि शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नित यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
सावित्रीबाई फुले शाळेमध्ये 26 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान संविधान दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. या विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.