महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

चंद्रपूर, ता. २६ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी शेवटची तारीख आहे.

भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिंगल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, म्युरल आर्ट स्पर्धा, शॉर्ट मूवी स्पर्धा, चित्रकला आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. या विविध स्पर्धांचे फोटो, व्हिडिओ, सॉफ्टकॉपी
infocspcreations@gmail.com या मेल आयडीवर २८ नोव्हेंबरपर्यंत पाठवा. प्राप्त प्रवेशिकेतून सर्वोत्कृष्ट निवडण्यात येवून पारितोषिक देण्यात येईल तसेच प्रोत्साहनपर बक्षीसही दिले जाणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केले आहे.