जिल्हा परिषद व पवनी पंचायत समिती निर्वाचक गणाची व्याप्ती व अंतिम सुधारित आरक्षणाची अधिसूचना 15 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द

जिल्हा परिषद व पवनी पंचायत समिती निर्वाचक गणाची व्याप्ती

व अंतिम सुधारित आरक्षणाची अधिसूचना 15 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द

भंडारा, दि. 14 : भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्हा परिषद निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पवनी पंचायत समिती निर्वाचक गणाची व्याप्ती व अंतिम सुधारित आरक्षणाची अधिसूचना 15 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. सदर अंतिम सुधारित अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, सर्व तहसील कार्यालय तसेच सर्व पंचायत समित्यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे प्रभारी अधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.

12 नोव्हेंबर 2021 रोजी काढण्यात आलेल्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार भंडारा जिल्हा परिषद मधील निवडणूक विभागाचे आरक्षण :- तुमसर तालुका- आष्टी (अनुसूचित जाती), चिखला (सर्वसाधारण), बपेरा सि. (सर्वसाधारण), चुल्हाड (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), सिहोरा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), गर्रा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), आंबागड (सर्वसाधारण महिला), येरली (सर्वसाधारण महिला), खापा (सर्वसाधारण), देव्हाडी (सर्वसाधारण). मोहाडी तालुका- कांद्रि (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), डोंगरगाव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), आंधळगाव (सर्वसाधारण), पाचगांव (सर्वसाधारण महिला), वरठी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), बेटाळा (सर्वसाधारण), करडी (सर्वसाधारण). साकोली तालुका- किन्ही/एकोडी (अनुसूचित जमाती महिला), पिंडकेपार (सर्वसाधारण), परसोडी/सौ. (अनुसूचित जाती महिला), कुंभली (सर्वसाधारण), वडद (अनुसूचित जाती), सानगडी (अनुसूचित जमाती). लाखनी तालुका- लाखोरी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), मुरमाडी/सा. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), केसलवाडा/वाघ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), पोहरा (अनुसूचित जाती महिला), मुरमाडी/तूप (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), पालांदूर/चौ. (सर्वसाधारण महिला). भंडारा तालुका- कोथुर्णा (सर्वसाधारण महिला), खमारी बुटी. (अनुसूचित जाती), धारगांव (सर्वसाधारण), आमगांव (सर्वसाधारण महिला), गणेशपूर (सर्वसाधारण), खोकरला (सर्वसाधारण), ठाणा (सर्वसाधारण महिला), सावरी/ज. (सर्वसाधारण महिला), सिल्ली (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), पहेला (अनुसूचित जमाती महिला). पवनी तालुका- अड्याळ-चिचाळ (सर्वसाधारण महिला), पिंपळगाव (सर्वसाधारण महिला), कोंढा (सर्वसाधारण महिला), ब्रम्ही (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), आसगांव (अनुसूचित जाती महिला), भुयार (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), सावरला (सर्वसाधारण). लाखांदूर तालुका- मासळ (सर्वसाधारण), दिघोरी/मो (सर्वसाधारण महिला), भागडी (अनुसूचित जाती), सरांडी बु. (अनुसूचित जाती महिला), मोहरणा (अनुसूचित जाती महिला), पिंपळगाव (अनुसूचित जमाती).

            पवनी पंचायत समिती मधिल निर्वाचक गणाचे आरक्षण :- चिचाळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), अड्याळ (अनुसूचित जाती महिला), तिर्री (सर्वसाधारण महिला), पिंपळगाव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), आकोट (सर्वसाधारण), कोंढा (सर्वसाधारण), ब्रम्ही (सर्वसाधारण), खैरी दिवान (अनुसूचित जाती), आसगांव (सर्वसाधारण), मांगली (अनुसूचित जाती महिला), कुर्झा (अनुसूचित जमाती), भुयार (सर्वसाधारण महिला), कोदुर्ली (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), सावरला (सर्वसाधारण महिला).