बँक ऑफ इंडियाच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

बँक ऑफ इंडियाच्या 116 व्या

वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भंडारा,दि.9:- 7 सप्टेंबर रोजी बँक ऑफ इंडियाच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त आरसेटी भंडारा यांच्या परिसरात बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी प्रबंधक अशोक कुंभलकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक प्रवीण घरडे, बँक ऑफ इंडियाचे प्रभारी व्यवस्थापक (एसकेव्हीके) डेविड डोंगरे, क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयाचे प्रबंधक एन. वाय. सोनकुसरे, आरसेटीचे निर्देशक सुजित बोदेले व आरसेटीचे कर्मचारी उपस्थित होते.