अपर मुख्य सचिवांचा ग्रामरोजगार सेवकांशी संवाद

अपर मुख्य सचिवांचा ग्रामरोजगार सेवकांशी संवाद

भंडारा,दि.6:- मगांराग्रारोहयो अंतर्गत विविध योजना व त्याअनुषंगाने सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी  महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार हे भंडारा येथे आले होते. जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे त्यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक मनुष्य दिवस तयार करणारे 50 ग्रामरोजगार सेवक यांचे सोबत संवाद साधला व चर्चा केली. ग्रामरोजगार सेवक यांनी उल्लेखनीय केलेल्या कामाबाबत अभिनंदन केले.
राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घूगे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) नुतन सावंत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीपती मोरे, सहा. गटविकास अधिकारी (नरेगा) गुणवंत खोब्रागडे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मग्रारोहयो अंतर्गत कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी समृध्दी बजेट अंतर्गत योग्य नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. विविध योजनाचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याकरिता यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देवून योग्य पध्दतीने नागरिकांना मार्गदर्शन करावे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती मोहाडी अंतर्गत ग्रामपंचायत धोप ला भेट देवून कामाची पाहणी केली.