महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती करणार जिल्ह्यातील कामांची पाहणी Ø 2 व 4 सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणी भेटी

महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती

करणार जिल्ह्यातील कामांची पाहणी

Ø 2 व 4 सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणी भेटी

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती गुरुवार दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्यात दाखल होणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम 4 सप्टेंबरपर्यंत आहे. या कालावधीत सदर समिती लोकप्रतिनिधींशी चर्चा, यंत्रणेच्या अधिका-यांसोबत बैठका तसेच विविध ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी करणार आहे.
गुरुवार दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी सदर समितीचे सदस्य हिराई विश्रामगृह, चंद्रपूर येथे सकाळी 9 ते 9.30 या वेळेत जिल्ह्याचे खासदार, आमदार व इतर संबंधित लोकप्रतिनिधींसोबत रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत अनौपचारिक चर्चा करतील. सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत जिल्ह्यातील स्थानिक जनतेकडून व स्वयंसेवी संस्थेकडून संबंधित विषयांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींबाबत व रोजगार हमी योजनेची कामे सुरू असलेल्या कामांना भेटी देण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांशी चर्चा. सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी. रात्री चंद्रपूर येथे मुक्काम.
शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी. रात्री चंद्रपूर येथे मुक्काम. शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 1.30 या वेळेत दोन दिवसांच्या दौ-यात आढळून आलेल्या बाबींबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिका-यांसोबत बैठक, दुपारी 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उर्वरीत बैठकीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख म्हणून सडक अर्जुनी (जि. गोंदिया) चे आमदार मनोहर चंद्रिकापूरे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 25 सदस्यांची (विधान परिषद व विधान सभा) चमू जिल्ह्यात येणार आहे.