नगर विकास विभागाकडून रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावाचे काम विहीत वेळेतच

नगर विकास विभागाकडून रस्त्यांच्या कामांच्या

प्रस्तावाचे काम विहीत वेळेतच

चंद्रपूर दि. 25 ऑगस्ट: चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांची कामे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी महापालिकेच्या चार सदस्यीय समितीने 29 मार्च रोजी ठराव पारित केला. 31 मार्च 2021 रोजी रस्त्यांच्या कामाची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र मनपाकडून पाठविण्यात आलेला सदर कामाचा प्रस्ताव हा अपरिपूर्ण होता. त्यामध्ये समाजकल्याण विभागाचा अहवाल सादर केलेला नव्हता. त्यानंतर मनपाने मध्यंतरी प्रस्ताव दाखल केल्यानंतर ठराव बदलण्यात आला त्यासोबतच कामेही बदलण्यात आली. तसेच मनपा प्रशासनाने समाजकल्याण विभागाचा परिपूर्ण अहवाल मागील आठवड्यातच या कार्यालयास सादर केला. त्यानंतर त्वरित कार्यवाही करत सात दिवसाच्या आत सदर कामांच्या प्रस्तावाची फाईल नगर विकास विभागाकडून निकाली काढण्यात आली असून दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली आहे.

सदर रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावाबाबत नगर विकास विभागाकडून विहित वेळेत काम झाले असून मनपा प्रशासनाकडून सदर कामांचा प्रस्ताव तसेच समाज कल्याण विभागाचा परिपूर्ण अहवाल सादर करण्यास दिरंगाई झाली आहे. असे नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके यांनी कळविले आहे.